'द राजा साब' मधील संजय दत्तचा फर्स्ट लुक प्रदर्शित
मुंबई, 30 जुलै (हिं.स.)। अभिनेता संजय दत्त लवकरच ‘द राजा साब’ या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटात एका हटके आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या लुक पोस्टरचं नुकतंच सोशल मीडियावर अनावरण करण्यात आलं असून, त्यात संजय दत्त एक
Raja


मुंबई, 30 जुलै (हिं.स.)। अभिनेता संजय दत्त लवकरच ‘द राजा साब’ या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटात एका हटके आणि रहस्यमय भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या लुक पोस्टरचं नुकतंच सोशल मीडियावर अनावरण करण्यात आलं असून, त्यात संजय दत्त एक भयावह आणि वयोवृद्ध रूपात दिसत आहेत. वाढलेले केस, थकलेले चेहऱ्यावरील भाव आणि संपूर्ण लुक प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतो.

यातली कथा एका अशा आजोबांची आहे (ज्यांची भूमिका संजय दत्त साकारत आहेत) ज्यांचा मृत्यू अकस्मात होतो आणि जे भूत बनून कथेत परत येतात. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत असून निधी अग्रवाल, मालविका मोहन आणि योगी बाबू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी संजय दत्तचा ‘धुरंधर’ हा आणखी एक चित्रपटही रिलीज होतो आहे, ज्यात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे संजय दत्तच्या चाहत्यांसाठी हा दिवस दुहेरी आनंद घेऊन येणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये निर्मात्यांनी लिहिलं आहे, ५ डिसेंबरला तयार रहा, संजू बाबांच्या अशा एका भयानक रूपाशी भेट होणार आहे, जे तुमचं हृदय गोठवेल.

‘द राजा साब’ मधील संजय दत्तचा हा आगळा वेगळा अंदाज आणि रहस्यभरीत लुक प्रेक्षकांमध्ये आधीच प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande