अभिनेता होईन याचा कधी विचारही केला नव्हता – सिद्धांत चतुर्वेदी
- स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी संघर्षांचा मार्ग – ''धडक-2'' २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले होते. आता त्याच भावनिक पार्श्वभूमीवर आधारित याचा पुढील भाग ‘धडक-2’ आणखी एक हृदयस्पर्शी प्रेमक
सिद्धांत चतुर्वेदी


- स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी संघर्षांचा मार्ग – 'धडक-2'

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘धडक’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले होते. आता त्याच भावनिक पार्श्वभूमीवर आधारित याचा पुढील भाग ‘धडक-2’ आणखी एक हृदयस्पर्शी प्रेमकहाणी घेऊन येत आहे. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शन शाजिया इक्बाल यांनी केले असून मुख्य भूमिकेत तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. या चित्रपटात प्रेम, सामाजिक भेदभाव आणि आत्मसंघर्ष यासारख्या मुद्द्यांना अत्यंत हळव्या आणि प्रभावी पद्धतीने मांडले गेले आहे. ‘धडक-2’ १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सिद्धांत चतुर्वेदी ने 'हिंदुस्थान समाचार' ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत चित्रपट आणि त्याच्या करिअरबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.

प्रश्न : या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?

उत्तर : जेव्हा मी या चित्रपटाची कथा पहिल्यांदा ऐकली, तेव्हा या चित्रपटाचं नावही ठरलेलं नव्हतं. ती अनटायटल्ड स्टोरी होती. पण कथेमध्ये इतकी खोली, संवेदनशीलता आणि परिणामकारकता होती की मी आणि तृप्ती, दोघांनीही लगेचच होकार दिला.

ही फक्त एक प्रेमकथा नाही, तर यामध्ये सामाजिक भेदभावाच्या अनेक पातळ्या आहेत. माझ्यासाठी ही एक प्रकारची आध्यात्मिक यात्रा आहे, जी दोन भिन्न जातींमधून येणाऱ्या पात्रांच्या प्रेमकथेच्या माध्यमातून खूप हळुवारपणे सादर केली आहे. मला वाटलं की या कथेमध्ये काहीतरी सांगण्यासारखं आहे, जाणवण्यासारखं आहे आणि हेच मला या चित्रपटाशी जोडून गेलं.

प्रश्न : आजचा युवा प्रेक्षक या कथेशी जोडला जाऊ शकेल का?

उत्तर : नक्कीच! मी आत्मविश्वासाने म्हणू शकतो की 'धडक २' ही प्रत्येक तरुणाची कथा आहे. जो आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी कठीण मार्गांवरून जातो. ही केवळ एक प्रेमकथा नाही तर भारतातील लाखो तरुणांच्या हृदयाला भिडणाऱ्या प्रवासाची झलक आहे. जेव्हा एखादा तरुण आपल्या गावातून किंवा छोट्या शहरातून मोठ्या शहरात जातो तेव्हा त्याच्याकडे खूप आशा आणि नवीन जीवन घडवण्याची आवड असते. त्याला अपेक्षा असते की त्याची ओळख, त्याची जात किंवा त्याची सामाजिक पार्श्वभूमी त्याच्यासाठी अडथळा बनू नये. त्याला एक माणूस म्हणून पाहिले पाहिजे, त्याच्या क्षमता आणि भावना समजून घ्याव्यात आणि तो त्याच्या नावाने किंवा ठिकाणाने परिभाषित केला जाऊ नये. हा चित्रपट त्या भावना, संघर्ष आणि प्रश्नांचा आरसा आहे. यात केवळ प्रेमाची निरागसताच नाही तर लोकांना विभाजित करण्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक रचनेच्या गुंतागुंती देखील आहेत. मला वाटते की आजचा तरुण या मुद्द्यांबद्दल खूप जागरूक आहे. ती समानता आणि आदर शोधत आहे आणि म्हणूनच मला खात्री आहे की हा चित्रपट त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल. 'धडक २' हा केवळ एक चित्रपट नाही तर एक भावनिक आणि सामाजिक दस्तऐवज आहे ज्यामध्ये प्रत्येक संवेदनशील प्रेक्षक स्वतःला शोधेल.

प्रश्न : तु कधी थिएटर केलं आहे का?

उत्तर : हो, शाळेच्या काळात काही थिएटर परफॉर्मन्स केले होते, पण ते खूपच मर्यादित होते. फारसं रंगभूमीचा अनुभव नव्हता.

खरं सांगायचं तर, तेव्हा मला कधी वाटलंच नाही की मी एक दिवस अभिनेता होईन. पण मला नेहमी नवीन गोष्टी करून पाहायला आवडायचं, स्वतःला आव्हान द्यायला आवडायचं. बहुधा हीच उत्सुकता मला हळूहळू अभिनयाच्या दिशेने घेऊन गेली.

जेव्हा एखादा पात्र साकारण्याची संधी मला मिळते, तेव्हा मी पूर्णपणे त्यामध्ये शिरतो, आणि प्रामाणिकपणे तो अनुभव जगायचा प्रयत्न करतो.

माझ्या मते, ही फक्त सुरुवात आहे – अजून खूप काही शिकायचं, समजून घ्यायचं आहे. मी स्वतःला दररोज एक विद्यार्थी समजतो, जो प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकत आहे.

प्रश्न : आजच्या काळात ‘आदर्श प्रेमकथा’ ही संकल्पना अस्तित्वात आहे का?

उत्तर : माझ्यासाठी तर ‘आदर्श प्रेमकथा’ अजूनही शोधात आहे. मी नेहमीच असं मानत आलोय की प्रेम ही जगातली सर्वात सुंदर आणि आवश्यक भावना आहे. याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं. असं नाही की पहिलं प्रेमच खरं किंवा शेवटचं असतं. कधी कधी वेगवेगळ्या लोकांना भेटून, वेगवेगळे अनुभव घेतल्यावर असा कोणी भेटतो, जो खरंच आपल्यासाठी या जगात आलेला असतो – जो आपल्याला समजतो, स्वीकारतो.

आजच्या पिढीने प्रेमाकडे केवळ भावना म्हणून नाही, तर एक जबाबदारी, एक प्रवास म्हणून पाहायला हवे. प्रामाणिकपणे, सचोटीने प्रेम निभावता यायला हवं.

जर तुम्ही स्वतःबद्दल, स्वतःच्या भावनांबद्दल प्रामाणिक असाल, तर खरे प्रेम एक दिवस नक्की तुमच्या जीवनात येईल. मी यावर विश्वास ठेवतो आणि आजही अशाच प्रेमाच्या प्रतीक्षेत आहे – जे केवळ हृदयाशी जोडलेलं असेल, कोणत्याही अटीशिवाय किंवा स्वार्थाविना.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande