मुंबई, 31 जुलै (हिं.स.) : अभिनेता ऋतिक रोशनच्या बहुप्रतीक्षित 'वॉर 2' चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचं पहिलं रोमँटिक गाणं 'आवन जावन' नुकतंच प्रदर्शित झालं असून, रिलीज होताच या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून साउथ सुपरस्टार जूनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यामुळे ‘वॉर 2’मध्ये एक नवा थरार पाहायला मिळणार आहे. यावेळी ऋतिक रोशनसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी झळकणार आहे.
‘आवन जावन’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असून त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे ऋतिक आणि कियारामधील जबरदस्त केमिस्ट्री. दोघांची ऑन-स्क्रीन बॉन्डिंग आणि सहज अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे. वायआरएफने हे गाणं कियाराच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी अनाउन्स करत चाहत्यांना खास सरप्राइझ दिलं.
हे रोमँटिक गाणं अरिजीत सिंग आणि निखिता गांधी यांनी आपल्या सुरेल आवाजात गायले आहे, तर त्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर