अभिनेत्री अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी
वॉशिंग्टन , 1 ऑगस्ट (हिं.स.)। ९० च्या दशकात मराठी सिनेमांमध्ये आघाडीवर असलेल्या अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक असून त्या सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. अमेरिकेतील त्यांचं घर, घरासमोर त्यांनी बनवलेली छोटी बाग याची झलक त्या दाखवत असतात. नुकतंच अमेर
अभिनेत्री अश्विनी भावे


वॉशिंग्टन , 1 ऑगस्ट (हिं.स.)। ९० च्या दशकात मराठी सिनेमांमध्ये आघाडीवर असलेल्या अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक असून त्या सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. अमेरिकेतील त्यांचं घर, घरासमोर त्यांनी बनवलेली छोटी बाग याची झलक त्या दाखवत असतात. नुकतंच अमेरिकेत नाफा सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. अवॉर्ड सोहळ्यानंतर सर्व कलाकार अश्विनी भावेंच्या घरी गेले. तिथे त्यांनी काय काय धमाल केली आणि अश्विनी भावे यांनी त्यांचं कसं स्वागत केलं याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

अश्विनी भावे यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत स्वप्नील जोशी, सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, अमोल पालेकर, अवधूत गुप्ते, मोहन आगाशे, आदिनाथ कोठारे दिसत आहेत. हे सर्वच नाफा पुरस्कार सोहळ्यानंतर त्यांच्या घरी पोहोचले आहेत. अश्विनी भावे म्हणतात, आज माझ्या यार्डमध्ये कोण आलं माहितीये का? ओळखा कोण कोण आहे? सगळे माझ्या घरासमोरचं गार्डन बघत एन्जॉय करत आहेत. मला खूप आनंद झाला आहे. सगळ्यांना मजा येतीये.

अश्विनी भावे यांनी सर्वांचं घरी आदरातिथ्य केलं. होम टूर केली. गार्डन दाखवलं. अख्खी मराठी इंडस्ट्री त्यांच्या घरी अवतरली होती. अवधूत गुप्तेने छान गाणंही ऐकवलं. या सगळ्याची झलक त्यांनी व्हिडिओतून सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'आनंदाने, हास्याने, प्रेमा भरलेलं घर - सगळं कॅमेऱ्यात कॅप्चर झालं आहे. नाफा फेअरवेल डिनर.

अश्विनी भावे गेल्या वर्षी 'घरत गणपती'मध्ये दिसल्या. यामध्ये त्यांनी भूषण प्रधानच्या आईची भूमिका साकारली जी सर्वांना आवडली. तसंच त्यांचा 'गुलाबी' हा सिनेमाही गेल्यावर्षीच आला. त्या सध्या अमेरिकेत असून पुन्हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande