मुंबई विमानतळावर ८ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक वीड जप्त ; ४ प्रवाशांना अटक
मुंबई, 31 जुलै (हिं.स.)।मुंबई विमानतळ कस्टम्स विभागाने 29-30 जुलै दरम्यान अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एकूण 8 कोटी रुपये किंमतीची 8.012 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केली असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 4 जणांना अटक केली आहे. मुंबई विमानतळ आ
हायड्रोपोनिक वीड


मुंबई, 31 जुलै (हिं.स.)।मुंबई विमानतळ कस्टम्स विभागाने 29-30 जुलै दरम्यान अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एकूण 8 कोटी रुपये किंमतीची 8.012 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केली असून दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 4 जणांना अटक केली आहे.

मुंबई विमानतळ आयुक्तालय कस्टम्स झोन-III च्या अधिकाऱ्यांनी 29 आणि 30 जुलै 2025 रोजीच्या ड्युटी दरम्यान एकूण 8.012 किलो हायड्रोपोनिक वीड जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात याची अंदाजे किंमत सुमारे 8 कोटी रुपये इतकी आहे. हे ड्रग्ज वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आले असून एकूण चार प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.पहिल्या प्रकरणात विशेष गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेल्या कस्टम अधिकाऱ्यांनी विझ एअरच्या फ्लाईट VZ760 द्वारे बँकॉकहून आलेल्या तीन प्रवाशांना थांबवलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये 1.990 किलोग्रॅम हायड्रोपोनिक वीड सापडली, ज्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे.हे ड्रग्ज ट्रॉली बॅगेच्या आत काळ्या आणि पारदर्शक व्हॅक्यूम सील पॅकेट्समध्ये लपवण्यात आले होते. या तिघांनाही एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.तर दुसऱ्या प्रकरणात प्रोफाइलिंगच्या आधारावर कस्टम अधिकाऱ्यांनी इंडिगो फ्लाईट 6E1060 ने बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला थांबवलं. त्याच्या चेक-इन बॅगमधून 6.022 किलो हायड्रोपोनिक वीड सापडली, ज्याची अंदाजे किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. हे ड्रग्ज अतिशय हुशारीने बॅगेच्या आत लपवण्यात आले होते. या प्रवाशालाही एनडीपीएस कायदा अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande