हैदराबाद, 31 जुलै (हिं.स.) : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला प्रवाशाच्या सामानातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने 400 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. या गांजाचे बाजार मूल्य 40 कोटी रुपये आहे. एनसीबीने अधिकृत निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
एनसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुप्तचर माहितीच्या आधारे, एनसीबी अधिकाऱ्यांनी महिला प्रवाशाला ताब्यात घेतले आणि तिच्या दोन चेक-इन बॅगमधून 400 किलो गांजा जप्त केला. तपासात असे आढळून आले की, महिलेने बँकॉकमधून हा गांजा खरेदी केला होता आणि संशय टाळण्यासाठी दुबईमार्गे भारतात परतली होती कारण बँकॉकहून थेट विविध भारतीय विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांकडून हायड्रोपोनिक गांजा जप्त केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. थायलंड आणि भारतातील या महिलेचे संबंध जाणून घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी