अनुराग कश्यप यांच्या ‘निशांची’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
मुंबई, 31 जुलै, (हिं.स.) : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट ‘निशांची’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी स्वतः केलं असून, नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात
अनुराग कश्यप यांच्या ‘निशांची’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित


मुंबई, 31 जुलै, (हिं.स.) : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट ‘निशांची’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी स्वतः केलं असून, नुकतंच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

‘निशांची’ या चित्रपटामधून शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. विशेष बाब म्हणजे ते या चित्रपटात डबल रोलमध्ये झळकणार असून, ही गोष्ट प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवणारी आहे. नुकत्याच प्रदर्शित पोस्टरमध्ये ऐश्वर्यसोबत अन्य प्रमुख कलाकारांची झलकही पाहायला मिळत आहे.

पोस्टर शेअर करताना अनुराग कश्यप यांनी लिहिलं, पोस्टर छपवा दिए हैं, अब लगने वाले हैं, अशा मजेशीर अंदाजात त्यांनी चित्रपटाच्या प्रचाराला सुरुवात केली.

हा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेला ड्रामा 19 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वेदिका पिंटो, मोनिका पनवार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तसेच मोहम्मद झीशान अय्यूब, कुमुद मिश्रा, पीयूष मिश्रा, मनन भारद्वाज आणि वरुण ग्रोवर यांच्यासारखे अनुभवी कलाकारही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

अनुराग कश्यप त्यांच्या बिनधास्त आणि हटके स्टोरी टेलिंगसाठी ओळखले जातात आणि ‘निशांची’ हे याचे आणखी एक उदाहरण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande