अमेरिकेची पाकिस्तानशी हातमिळवणी ; केला मोठा करार
वॉशिंग्टन, 31 जुलै (हिं.स.) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केली आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी (31 जुलै) सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात एक करार झाला आहे. या करारा अंतर्गत दोन्ही देश
अमेरिका - पाक


वॉशिंग्टन, 31 जुलै (हिं.स.) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केली आहे. ट्रम्प यांनी गुरुवारी (31 जुलै) सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात एक करार झाला आहे. या करारा अंतर्गत दोन्ही देश तेल साठ्याच्या विकासावर एकत्र काम करतील. या कराराच्या माध्यमातून ट्रम्प यांनी भारताला बाजूला केल्याचं दिसून येत आहे.यावेळी ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाबाबतही एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर लिहिले कि, “आम्ही पाकिस्तानसोबत एक करार केला आहे, ज्याअंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका त्यांच्या विशाल तेल साठ्याच्या विकासासाठी एकत्र काम करतील. आम्ही अशा एका तेल कंपनीची निवड करत आहोत जी या भागीदारीचं नेतृत्व करेल. कोण जाणे, कदाचित भविष्यात पाकिस्तान भारतालाही तेल विकेल!” पुढे ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचा उल्लेख करत सांगितले कि, “आम्ही व्हाईट हाऊसमध्ये व्यापार करारावर काम करण्यात खूप व्यस्त आहोत. मी अनेक देशांच्या नेत्यांशी बोललो आहे आणि ते सर्वच अमेरिका खुश व्हावी अशी इच्छा बाळगतात. आज दुपारी मी दक्षिण कोरियाच्या व्यापार प्रतिनिधीमंडळाशी भेटणार आहे. सध्या दक्षिण कोरिया 25% टॅरिफवर आहे, पण त्यांच्याकडे ते टॅरिफ कमी करण्याचा एक प्रस्ताव आहे. मला हे जाणून घेण्यात रस आहे की, तो प्रस्ताव नेमका काय आहे.” ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, अनेक देश टॅरिफ कमी करण्याचे प्रस्ताव देत आहेत, आणि यामुळे अमेरिकेचा व्यापार तुटीचा मोठा प्रश्न बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. त्यांनी हेही स्पष्ट केले की, योग्य वेळ आल्यावर याबाबत सविस्तर अहवाल जारी केला जाईल. भारताबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे आणि तो लवकरच अंतिम रूप घेऊ शकतो. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की भारत आणि अमेरिकेतील व्यापार संतुलित नाही. भारत अमेरिकेसोबत तुलनेत खूपच कमी व्यापार करतो. ---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande