अहिल्यानगर : अक्षय वैद्य विशेष दिव्यांग गौरव पुरस्काराने सन्मानित
अहिल्यानगर, 4 जुलै (हिं.स.)। दिव्यांग जलतरणपटू अक्षय सुनील वैद्य याला माहेर संस्थेतर्फे राळेगणसिद्धी या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते विशेष दिव्यांग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अक्षय वैद्य हा दिव्य
दिव्यांग जलतरणपटू अक्षय वैद्य विशेष दिव्यांग गौरव पुरस्काराने सन्मानित


अहिल्यानगर, 4 जुलै (हिं.स.)। दिव्यांग जलतरणपटू अक्षय सुनील वैद्य याला माहेर संस्थेतर्फे राळेगणसिद्धी या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते विशेष दिव्यांग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अक्षय वैद्य हा दिव्यांग जलतरणपटू असून जलतरण मध्ये दिव्यांग गटातून विविध बक्षिसे पटकावली आहेत. तर समुद्रात देखील पोहण्याचा विक्रम त्याने केलेला आहे. तसेच कोरोना काळात केलेल्या समाज जागृतीचे कार्य आणि नुकतेच दिव्यांग मुलीशी विवाह करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला. या कार्याची दखल घेऊन माहेर संस्थेच्या वतीने अक्षय वैद्य याला विशेष दिव्यांग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याचे विशेष कौतुक केले. या सन्मानाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande