अहिल्यानगर, 4 जुलै (हिं.स.)। दर्गाह हजरत पीर बारा इमाम कोठला ट्रस्ट व जहागीरदार परिवाराच्या वतीने बारा इमाम कोठला येथे मोहरमनिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. इमामे हसन-हुसेन यांच्या सवारीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी या भंडाऱ्याचा लाभ घेतला. यावेळी सरबतचे देखील वाटप करण्यात आले.
सय्यद दस्तगीर बडेसाब म्हणाले की, सामाजिक एकात्मतेचे दर्शन कोठला येथे मोहरमच्या माध्यमातून घडते. दरवर्षी मोहरम मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सर्व धर्मिय भाविक दर्शनासाठी येत असतात. आलेल्या भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni