राज ठाकरे यांच्यावरील पोस्टनंतर व्यवसायिक सुशील केडियांची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी
मुंबई, 4 जुलै (हिं.स.)।सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद शिगेला पोहचला आहे.अशातच अलीकडे मीरा रोडवरील एका दुकानदाराने मराठीमध्ये बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केल्याच्या व्हिडीओनंतर व्यवसायिक सुशील केडीया
Sushil kediya


मुंबई, 4 जुलै (हिं.स.)।सध्या महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद शिगेला पोहचला आहे.अशातच अलीकडे मीरा रोडवरील एका दुकानदाराने मराठीमध्ये बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केल्याच्या व्हिडीओनंतर व्यवसायिक सुशील केडीया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन राज ठाकरेंना टॅग केलं होत की, मराठीत बोलणार नाही काय करायचं ते बोल असे म्हटले आहे. त्यानंतर आता पुन्हा सुशील केडीया यांनी एक्स वर ट्विट करत त्यांना पोलीस सुरक्षा हवी असल्याचं म्हटलं आहे.

मीरा रोडवरील एका दुकानदाराने मराठीमध्ये बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने हल्ला केल्याच्या व्हिडीओनंतर केडिया यांनी एक्स पोस्ट करत म्हटले आहे,मुंबईत ३० वर्ष राहूनही मला मराठी बोलता येत नाही आणि तुमच्या गैरवर्तनामुळे मी प्रतिज्ञा केली आहे की, जो पर्यंत तुमच्या लोकांना मराठी लोकांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोल?

प्रसिद्ध व्यवसायिक केडिया यांची ही सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून त्यांच्या त्या पोस्टनंतर पुन्हा केडिया यांनी पोस्ट करत मनसैनिक त्यांना धमक्या देत असून त्यांच्यापासून वाचण्यासाठी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रकरणी काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

केडिया यांच्या पोस्ट नंतर मनसैनिक मनोज चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हणाले, राजकारणात ज्या गोष्टी सुरू आहेत त्यामध्ये मराठी विषय,राज ठाकरे उध्दव ठाकरे यांच्यावर बोलल की फेमस होत. भाषेवर कोणी काही बोलत असेल तर त्यांच्या कानफडात बसणारच महाराष्ट्रात मराठीत ज्याला कुणाला येत नसेल त्यांना आम्ही मराठी भाषेत शिकवू. मराठी शिकायचेच नाही काय करायचं असेल ते करून घ्या यापुढे कानाखाली जाळच काढल्या जाईल. सुशील केडिया कोण आहे? उद्याचे पाच तारखेचा झाल्यानंतर निश्चितपणे त्याला काय करायचं ते करू. त्यांनी त्याचे ॲक्शन केले आता आमचे रिएक्शन करण्याची वेळ आली आहे. असे मनसैनिक मनोज चव्हाण म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande