मुंबई, 4 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा सत्कार महाराष्ट्र विधानमंडळातर्फे करण्यात येणार आहे. हा गौरव सोहळा मंगळवार, ८ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजता, विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे, अशी घोषणा विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात केली. सत्कारानंतर सरन्यायाधीश भूषण गवई हे भारताची राज्यघटना या विषयावर दोन्ही सभागृहांतील सन्माननीय सदस्यांना संबोधित करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी