श्रावणबाळ वृध्दपकाळ योजना लाभार्थ्यांना आधार कार्ड अदयावत करुन घेण्याचे आवाहन
जळगाव, 4 जुलै, (हिं.स.) : विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधीनिराधार योजना आणी श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेचे मंजुर लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ पासुन डीबीटी प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यावर लाभ वितरीत केले जाते. परंतु
श्रावणबाळ वृध्दपकाळ योजना लाभार्थ्यांना आधार कार्ड अदयावत करुन घेण्याचे आवाहन


जळगाव, 4 जुलै, (हिं.स.) : विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधीनिराधार योजना आणी श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेचे मंजुर लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ पासुन डीबीटी प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यावर लाभ वितरीत केले जाते.

परंतु काही लाभार्थ्यांचे अदयापपावेतो आधार अदयावतीकरण व केवायसी न झाल्याने त्यांना लाभापासुन वंचीत रहावे लागत आहे. सदर या व्दारे पात्र लाभार्थ्यांपैकी ज्या लाभार्थ्यांचे आधार अदयावतीकरण झालेले नाही त्या लाभार्थ्यांपैकी त्वरीत नजीकच्या आधार केंद्रावर जावुन आधार कार्ड अदयावत करुन घ्यावे व संजय गांधी नीराधार योजना व श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेसाठी बँकेत खाते उघडले असेल तीथे जावून आधार KYC करुन घेणे बाबत तहसीलदार भुसावळ यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे. असे तहसीलदार भुसावळ यांनी कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande