’पीएमपी’चे २५ कर्मचारी निलंबित; कामात कुचराई केल्याने कारवाई
पुणे, 4 जुलै (हिं.स.)। प्रवाशांची सोय व्हावी व ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढावे यासाठी दुपारच्या सत्रातील बसच्या वाहतुकीवर ‘पीएमपी’च्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले आहे. मुख्यालयात बसून असणाऱ्या विभाग प्रमुखांना आगारात पालक अधिकारी म्हणून पाठविण्यात आले. तर
’पीएमपी’चे २५ कर्मचारी निलंबित; कामात कुचराई केल्याने कारवाई


पुणे, 4 जुलै (हिं.स.)। प्रवाशांची सोय व्हावी व ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढावे यासाठी दुपारच्या सत्रातील बसच्या वाहतुकीवर ‘पीएमपी’च्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले आहे. मुख्यालयात बसून असणाऱ्या विभाग प्रमुखांना आगारात पालक अधिकारी म्हणून पाठविण्यात आले. तर बंद पडणाऱ्या बस, रद्द होणारे मार्ग यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कामात कुचराई करणाऱ्या सुमारे २५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘पीएमपी’च्या विविध आगारातील दुपारच्या सत्रातील बस बंद पडत आहेत. विशेषतः ई बस चार्जिंगअभावी दुपारच्या सत्रात बंद पडत असल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. बस बंद पडल्याने फेरी रद्द होते. त्यामुळे ‘पीएमपी’चे उत्पन्नदेखील बुडते. यापूर्वी ‘पीएमपी’ प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून बंद पडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. परिणामी आता ‘पीएमपी’ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande