सोलापूर - जिल्ह्यात खरीपाची 93 टक्के पेरणी
सोलापूर, 4 जुलै (हिं.स.)। यंदा सोलापूरसह राज्यात पावसास मे महिन्याच्या मध्यापासून सुरुवात झाली आहे. यंदा पाऊसमानही चांगला आहे. त्यामुळे पेरणीला लवकर सुरुवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून
सोलापूर - जिल्ह्यात खरीपाची 93 टक्के पेरणी


सोलापूर, 4 जुलै (हिं.स.)। यंदा सोलापूरसह राज्यात पावसास मे महिन्याच्या मध्यापासून सुरुवात झाली आहे. यंदा पाऊसमानही चांगला आहे. त्यामुळे पेरणीला लवकर सुरुवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली असून, आता खरीप पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचा सरासरी पेरणी क्षेत्र हे 3 लाख 37 हजार 96.13 हेक्टर असून त्यापैकी 3 लाख 15 हजार 32.68 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सुमारे 93.21 टक्के पूर्ण झाली आहे.

यंदा शेतकर्‍यांचा ओढा मका, सोयाबीन, उडीद या पिकांकडे असल्याचे दिसत आहे. या दोन्ही पिकांची पेरणीची सरासरी ही इतर पिकांपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 81270 इतकी असून 91448 हेक्टरवर पेरणी झाली असून, सरासरीच्या 112 टक्के पेरणी झाली आहे. उडिदाचे सरासरी क्षेत्र हे 58166.04 हेक्टर असून 80517.8 म्हणजे सरासरीच्या 138 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कमी कालावधीत आणि पावसावर येणारे पीक म्हणून मक्याकडे पाहिले जाते. यंदा शेतकर्‍यांनी मका पिकांची मोठ्याप्रमाणात पेरणी केली आहे. जिल्ह्यात मका पिकाची सरासरी क्षेत्र ही 47861.1 हेक्टर असून, 53764 हेक्टरवर म्हणजे 112.33 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande