'मरे'च्या मुंबई विभागाची ५.३८ दशलक्ष टन मालवाहतूकीची नोंद
मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ५.३८ दशलक्ष टन मालवाहतुकीची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात केवळ जून २०२५ मधील १.९५ दशलक्ष टन मालवाहतूक समाविष्ट आहे. या कालावधीत झालेल्या मालवाहतुकीतून
'मरे'च्या मुंबई विभागाची ५.३८ दशलक्ष टन मालवाहतूकीची नोंद


मुंबई, 5 जुलै (हिं.स.)। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत ५.३८ दशलक्ष टन मालवाहतुकीची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात केवळ जून २०२५ मधील १.९५ दशलक्ष टन मालवाहतूक समाविष्ट आहे.

या कालावधीत झालेल्या मालवाहतुकीतून विभागाला एकूण ₹४९२ कोटी उत्पन्न झाले असून त्यापैकी ₹१७६ कोटी फक्त जून २०२५ मधील उत्पन्न आहे.

कंटेनर लोडिंग :

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPT) येथून झालेल्या कंटेनर लोडिंगमध्ये वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत १८% वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीत एप्रिल ते जून २०२५ दरम्यान १७६८ रेक्स लोड करण्यात आले, जे मागील वर्षी याच कालावधीत १४९१ रेक्स होते. दि. १९.६.२०१५ रोजी १२३९ कंटेनर्स लोड करण्यात आले, ही सध्याच्या वित्तीय वर्षातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

वॅगन लोडिंग :

वॅगन लोडिंगमध्येही सकारात्मक वाढ दिसून आली आहे.

एप्रिल ते जून २०२५ दरम्यान सरासरी १४४५ वॅगन्स प्रतिदिन लोड करण्यात आले, जे मागील वर्षी याच कालावधीत १३८८ वॅगन्स प्रतिदिन होते – म्हणजे ४% वाढ. जून २०२५ मध्ये मासिक सरासरी १५५० वॅगन्स प्रति दिवस लोड करण्यात आले, जे जून २०२४ मध्ये १५०५ वॅगन्स होते – म्हणजे ३% वाढ झालेली आहे.

दि. १९.६.२०२५ रोजी १९१२ वॅगन्स लोड करण्यात आले, ही सध्याच्या वर्षातील सर्वोत्तम नोंद आहे.

रेक लोडिंग / अनलोडिंग :

रेक लोडिंग व अनलोडिंगमध्येही सकारात्मक कामगिरी दिसून आली आहे.

जून २०२५ मध्ये १०४६ रेक्स लोड करण्यात आले, जे जून २०२४ मध्ये १००९ रेक्स होते, म्हणजे ३% पेक्षा जास्त वाढ झाले आहे. याच कालावधीत १०५३ रेक्स अनलोड करण्यात आले, जे गेल्या वर्षी जूनमध्ये ९७४ रेक्स होते – म्हणजे ८% पेक्षा जास्त वाढ झालेली आहे.

बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्सचा यशस्वी उपक्रम :

मुंबई विभागात स्थापन करण्यात आलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्सनी अत्यंत सकारात्मक कामगिरी केली आहे. सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC) च्या मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा लि. यांचे यंत्रसामग्रीचे भाग दि. २९.६.२०२५ रोजी सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC) सायडिंग, कळंबोली येथून सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC) बामनहेरी, उत्तर प्रदेश येथे पाठविण्यात आले. या लोडिंगमधून ₹२५.९६ लाख (GST वगळून) इतके मालवाहतूक उत्पन्न झाले. सुरुवातीला प्रतिसप्ताह १ रेक लोडिंग करण्यात येणार असून, भविष्यात ते ४ ते ५ रेक्स प्रतिसप्ताह करण्याचा मानस आहे.

मुंबई विभागाने मालवाहतूक वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून मालवाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande