अंकारा, 5 जुलै (हिं.स.) : तुर्कीमध्ये
विरोधकांवर दडपशाही सुरूच आहे. याचाच एक भाग म्हणून, शनिवारी तुर्कीच्या दक्षिणेकडील शहरांच्या तीन महापौरांना अटक
करण्यात आली. सरकारने अटक केलेल्या विरोधी नेत्यांच्या यादीत आणखी तीन नवीन नावे
जोडली गेली आहेत. मार्चच्या सुरुवातीला, तुर्कीच्या
प्रमुख शहर इस्तंबूलच्या महापौरांनाही अटक करण्यात आली होती.
अटक
करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये आदियामन शहराचे महापौर अब्दुल रहमान तुतदेरे आणि
अदाना नगरपालिका प्रमुख झेदान करालर यांचा समावेश आहे. ज्यांना शनिवारी सकाळी ताब्यात
घेण्यात आले. दोन्ही नेते तुर्कीच्या मुख्य विरोधी पक्ष रिपब्लिकन पीपल्स पार्टी
किंवा सीएचपीचे
सदस्य आहेत. अंतल्या शहराचे महापौर मुहितिन बोकेक, जे सीएचपीशी देखील संबंधित आहेत.त्यांनाही लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात
आली आहे. करालरला इस्तंबूलमध्ये पकडण्यात आले, तर
तुतदेरेला राजधानी अंकारा येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी
सांगितले की, करालार
आणि तुतडेरे यांच्यासह १० जणांना संघटित गुन्हेगारी, लाचखोरी यासारख्या प्रकरणांमध्ये अटक करण्यात
आली आहे. त्यांच्यावरील आरोपांची माहिती कळलेली नाही. पण विरोधी पक्षांशी संबंधित
नेत्यांवर कारवाई सुरू आहे. राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांचे मुख्य
प्रतिस्पर्धी मानले जाणारे इस्तंबूलचे महापौर एकरेम इमामोग्लू यांना
भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चार महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra