अकोला, 6 जुलै (हिं.स.)। अकोल्याचे ग्रामदैवत राजेश्वर यांना गेल्या 78 वर्षापासून जलाभिषेक करण्याची करण्याची परंपरा सुरू असून 14 जुलै ते 18 ऑगस्ट पर्यंत कावड यात्रा सुरू होणार आहे. या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे विकास आणि सर्वसामान्यांचे संवेदनात जाणून घेणारे आमदार रणधीर सावरकर यांनी आज शहरातील विविध कावड यात्रा काढणाऱ्या भक्तांची संवाद साधून येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन ताबडतोब अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश दिले.
अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कावड यात्रा निघतात. अकोट अकोला मुर्तीजापुर पातुर बार्शीटाकळी या भागात भावी भक्त मोठ्या प्रमाणात जलाभिषेक ओमकारेश्वर उज्जैन केदारनाथ या भागातून जलाभिषेक जल आणून करत असतात. अकोला शहरात पूर्णा नदी गांधीग्राम इथून जलाभिषेक करण्याची परंपरा सुरू असून 14 जुलै या पहिल्या सोमवारपासून ऑ गस्ट पर्यंत कावडदारी वेगवेगळ्या वर्गातील नागरिक मातृ शक्ती कावडदवारे जलाभिषेक 78 वर्षापासून सातत्याने परंपरा सुरू आहे. या परंपरेला वृद्धिगत करणाऱ्या तीन पिढीच्या शिवभक्तांच्या भावना आज आमदार सावरकर यांनी जाणून घेऊन या संदर्भात अडीअडचणी व सुविधा संदर्भात माहिती घेतली व या संद व त्यांच्याशी चर्चा विनिमय करून संवाद साधला रुद्रवतार शिवभक्त मंडळ सुदर्शन नवयुग मंडळ नागेश्वर मंडळ कल्याणी मंडळ एकता शिवभक्त मंडळ डाबकी रोड जगदंबा शिवभक्त मंडळ छत्रपती शिवभक्त मंडळ हनुमान वस्ती हनुमान मित्र मंडळ मारीपुरा भक्त मंडळ कनकेश्वर शिवभक्त मंडळ रुद्रवतारशी भक्त मंडळ ओमकारेश्वर उमरी ईश्वर तांडव मित्र मंडळ सह अनेक मंडळाची संवाद साधला.
पथदिवे संदर्भात मनपा आणि जिल्हा परिषदला निर्देश देण्यात आले तसेच रस्ते दुरुस्ती संदर्भात महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महावितरण शहरी आणि ग्रामीण कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग उप जिल्हाधिकारी मदत व पुनर्वसन जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी तहसीलदार अकोट अकोला वाहतूक नियंत्रण अधिकारी, आरटीओ मनपा आयुक्त यांना या संदर्भात निर्देश देण्यात आले असून यासंदर्भात पूर्वतयारी संदर्भात अधिवेशनाच्या काळानंतर आपण लवकरच येऊन भक्तांना सुविधा उपलब्ध झाल्या की नाही याची सहनिशा करणार व भक्तांच्या सुविधांसाठी निधी कमी पडू देता कामा नये यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर व जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी सदैव कटिबद्ध असून सनातन परंपरा वृद्धिगत करणाऱ्या शिवभक्तांच्या भावना आमदार सावरकर यांनी जाणून ताबडतोब विविध विभागाला या संदर्भात निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे