अकोल्यात शिवसेनेला (उबाठा) बळकटी देणार, युवकांचा निर्धार !
अकोला, 6 जुलै (हिं.स.)। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी व आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी चिखलगाव, माझोड परिसरातील युवकांनी निर्धार केला. या भागातील विविध पक्षाच्या माजी सरपंच, पंस सदस्यांसह शेकडो कार्येकर्त
P


अकोला, 6 जुलै (हिं.स.)।

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी व आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी चिखलगाव, माझोड परिसरातील युवकांनी निर्धार केला. या भागातील विविध पक्षाच्या माजी सरपंच, पंस सदस्यांसह शेकडो कार्येकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.

शिवसेना उपनेते आ. नितीन देशमुख माजी आमदार हरिदास भदे, जिल्हाप्रमुख गोपालराव दातकर यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

यावेळी शिवसेना नेते प्रा. डॉ. संतोष हुशे उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, योगेश्वर वानखडे, शहर प्रमुख राहुल कराळे, युवासेना जिल्हाप्रमुख अभय खुमकर, तालुकाप्रमुख नितीन ताथोड, डॉ गजानन मानकर संघटक शेतकरी सेना आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सचिन थोरात, माझोडचे माजी सरपंच गजानन निलखन, चिखलगाव उपसरपंच शिवलाल पाटील ताले, सुनील वावकर, अनंतराव वाकोडे प्रवीण चतरकर, अनिरुद्ध चतरकर, विकी येवले, शरद चतरकार आदींसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande