अकोला, 6 जुलै (हिं.स.)।
माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी 85 अंडरपास तयार करून दक्षिण मध्य रेल्वेला न्याय मिळवून दिला. आता मध्य रेल्वे मधील रेल्वे गेटवर अंडरपास आणि ओवर बीज बनवण्याचं काम खासदार अनुप धोत्रे यांनी सुरू केले असून या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. भुयारी मार्गाच्या कामासाठी 50 कोटी रुपये खर्च करून जनतेला सुविधा उपलब्ध करून देऊन दळणवळणाच्या व वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध केले आहे. रेल्वे गेट हा मार्ग शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी उपयोगी पडेल, असा विश्वास आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला.
खासदार अनु धोत्रे यांच्या प्रयत्नाने अन्वी रेल्वे गेटवर उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचा भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संतोष शिवरकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनुप धोत्रे प्रवीण हगवणे अनिल गावंडे श्रीकृष्ण ठोकळ सुबोध गवई पंकज वाडी वाले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात रेल्वेत अनेक सुविधा प्रवाशांना मिळत असून भारत हा रेल्वे मध्ये निर्यात करणारा देश ठरवत असून देशातील वैज्ञानिक इंजिनियर यांनी क्रांती करून जपान आणि फ्रान्स याला या क्षेत्रामध्ये मागे टाकल्या असून ग्रामीण आणि शहरी भागातील दळणवळणाच्या सुविधेसाठी हा आमदार सावरकर यांच्या मागणीनुसार हा रस्ता होत असल्याची माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे