छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत प्रधानमंत्री जनमन योजना, प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, शबरी आदिवासी घरकुल योजना, वनहक्क दावे तसेच आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या सर्व योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी पद्धतीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
तसेच शबरी आदिवासी घरकुल योजना व धरती आबा जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कॅम्पेनचा आढावा घेतला. विभागातील जिल्हानिहाय माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून घेतली.
या बैठकीला खासदार संदिपान भुमरे, आमदार भीमराव केराम, आमदार संजना जाधव, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी, यांच्यासह दुरदृष्यप्रणालीद्वारे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis