छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत प्रकूलगुरु डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्य समोरील हिरवळीवर ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम झाला .
यावेळी अधिष्ठाता डॉ एम डी शिरसाट, डॉ. वैशाली खापर्डे, डॉ. बी एन डोळे, डॉ. कैलास अंभुरे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता कुलगुरू डॉ विजय फुलारी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis