नांदेड, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
देशाच्या पंजाब राज्यातील 100 महिला सरपंच अभ्यास दौऱ्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगीला भेट देऊन पाहणी करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी येणार आहेत.
गावातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरासमोर, परिसरात ,गावात स्वच्छता ठेवावी. सर्व महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढावी. पंजाब येथून येणाऱ्या सर्व 100 महिला सरपंचाचे स्वागत करण्यासाठी आपापल्या पारंपरिक वेशभूषेत तयार रहावे.
15 ऑगस्ट रोजी गावातील सर्व महिलांनी अन्यत्र कोठेही न जाता गावात उपस्थित रहावे, असे आवाहन
ग्रामपंचायत कार्यालय येरगी ता.देगलूर जि.नांदेड वतीने करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis