छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा सिल्लोड शहर मंडळ तर्फे सिल्लोड शहरातून तलाठी भवन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भव्य तिरंगा यात्रा जल्लोषात पार पडली.
सूर्याच्या पहिल्या किरणांप्रमाणेच तिरंग्याचे तेज संपूर्ण शहरभर पसरले होते. तिरंगा फडकवून, आपल्या राष्ट्रशक्तीचे प्रतीक असलेल्या या पवित्र ध्वजाला वंदन करण्यात आले. तसेच स्वतंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांसह शुरवीर भारतीय जवानांना अभिवादन करण्यात आले.
या यात्रेत नागरिकांसह, नेते कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभाग झाले होते. हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीची घोषणा आणि हृदयात मातृभूमीविषयीची अपार श्रद्धा — अशा वातावरणात शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले होते.
ही तिरंगा यात्रा केवळ मिरवणूक नव्हती. तर, आपल्या एकतेचा, अभिमानाचा आणि अमर देशप्रेमाचा संदेश होती.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis