अल्लू अर्जुनची आजी अल्लू कंकररत्नम यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन
हैदराबाद, 30 ऑगस्ट (हिं.स.) - तेलुगू चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनची आजी आणि प्रतिष्ठित अल्लू कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य अल्लू कंकररत्नम यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ३० ऑगस्ट रोजी पहाटे १:४५ वाजता हैदराब
अल्लू अर्जुव आणि त्याची आजी


हैदराबाद, 30 ऑगस्ट (हिं.स.) - तेलुगू चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुपरस्टार अल्लू अर्जुनची आजी आणि प्रतिष्ठित अल्लू कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य अल्लू कंकररत्नम यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. ३० ऑगस्ट रोजी पहाटे १:४५ वाजता हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या वयोमानाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होत्या असे सांगण्यात येत आहे.

निधनाची बातमी मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अल्लू अर्जुन कामासाठी मुंबईत उपस्थित होता. आजीच्या निधनाची बातमी मिळताच तो लगेचच विमानाने हैदराबादला रवाना झाला. विमानतळावरून त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तो खूप अस्वस्थ दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते त्याच्या दुःखात सामील होत आहेत.

अल्लू अर्जुन त्यांच्या आजीच्या खूप जवळचे होते आणि अनेकदा कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांची झलक सोशल मीडियावर शेअर करत असे. कनकरत्नमजींच्या निधनाने केवळ अल्लू कुटुंबातच नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीत दुःखाची लाट पसरली आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीशी संबंधित कलाकार आणि चाहते मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहत आहेत. या दुःखाच्या क्षणी कुटुंबातील आणखी एक सदस्य आणि मेगास्टार चिरंजीवीचा जावई आणि सुपरस्टार राम चरण यांनेही त्याचे शूटिंग थांबवले आहे. तो म्हैसूरमध्ये त्यांच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटाचे शूटिंग करत होतो. पण अल्लू कनकरत्नमजींच्या निधनाची बातमी मिळताच त्याने शूटिंग अर्ध्यावरच थांबवत तो हैदरबादला परतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande