पुणे, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
३७व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल करंडक ’ एम आय टी ने पटकवला बालगंधर्व रंगमंदिरात शनिवार, दि. ३० ऑगस्ट रोजी झालेल्या स्पर्धेला युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. या स्पर्धेसाठी अॅड. अनुराधा भारती व प्रतीक कुमुद यांनी पुणे फेस्टिव्हल करिता याचे संयोजन केले होते.
व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत 25 ते 60 आणि 61 प्लस अश्या 2 वयोगटात हिंदी - गाता रहे मेरा दिल मराठी - मोगरा फुलला आणि गझल व सुफी - शाम ए सुखन असे गट होते त्यामध्ये 25 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले. या स्पर्धेत 25 ते 60 च्या वयोगटात मराठी गटात अनंत गोसावी व संजय लागू, हिंदी गटात विशाल फडतरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले. ६१ व पुढे च्या वयोगटात मराठी गटात डॉक्टर ताम्हणकर व चंद्रशेखर परांजपे तर हिंदी गटात दिलीप नाजरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले. गझल गटात शुभ्रसमीर दास व स्नेहा केळकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवले. दीपक दास व पिनाक भिंगारे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे पटकावली.
पुणे फेस्टिव्हल करंडक स्पर्धेत अनेक महाविद्यालयांनी भाग घेतला होता. त्यातील अंतिम फेरीसाठी एम आय टी व डी वाय पाटील महाविद्यालयांची निवड झाली होती. त्यामध्ये एम आय टी कॉलेज यांनी व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल करंडक पटकावला.
विद्या ताई गोखले व अपर्णा ताई पणशिकर यांनी याचे परीक्षक म्हणून काम पहिले. निवेदक म्हणून आकाश सोळंकी यांनी जबाबदारी सांभाळली.
‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिव्हल' स्पर्धेचे यंदाचे १५ वे वर्ष व ' व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल करंडक’ स्पर्धेचे ३ रे वर्ष होते. बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त आयुक्त (गुन्हे अन्वेषण) पंकज देशमुख, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, या स्पर्धेच्या समन्वयक अॅड. अनुराधा भारती, पत्रकार संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले, अतुल गोंजारी यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर