जम्मू, ३१ ऑगस्ट (हिं.स.). जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्हा पूंछ येथे पोलिसांनी शस्त्रांसह दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. आजमाबाद येथील तारिक शेख आणि चेंबर गावातील रियाज अहमद अशी या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, शेख आणि त्याचा साथीदार अहमद यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक करण्यात आली. चौकशीनंतर पोलीस पथकाने शेख यांच्या जालियन गावातील भाड्याच्या घरातही छापा टाकला आणि तेथून दोन असॉल्ट रायफल आणि काही काडतुसे जप्त केली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे