एअर इंडियाचे इंदूरला जाणारे विमान दिल्लीला परतले
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट (हिं.स.)इंदूरला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच दिल्लीला परतले. विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत वैमानिकाला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर विमान दिल्लीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. एअर इंडिया
एअर इंडिया विमान


नवी दिल्ली, 31 ऑगस्ट (हिं.स.)इंदूरला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच दिल्लीला परतले. विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत वैमानिकाला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर विमान दिल्लीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

एअर इंडियाने सांगितले की, विमान तपासणीसाठी थांबवण्यात आले आहे आणि प्रवाशांना पर्यायी विमानात पाठवण्यात येत आहे. जे लवकरच इंदूरला उड्डाण करेल.

एअरलाइनने तपशील न देता सांगितले की, '३१ ऑगस्ट रोजी दिल्लीहून इंदूरला जाणारे विमान AI2913 उड्डाणानंतर लगेचच दिल्लीला परतले. कारण कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे संकेत मिळाले.'

त्यांनी सांगितले की, मानक प्रक्रियेचे पालन करून कॉकपिट क्रूने इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आणि विमान दिल्लीला परत आणण्यात आले. जिथे विमान सुरक्षितपणे उतरले. एअरलाइनने सांगितले की, हवाई सुरक्षा नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande