अहमदाबाद, 31 ऑगस्ट (हिं.स.)।केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज, रविवारी अहमदाबाद दौऱ्यावर शहरी आरोग्य केंद्रांचे लोकार्पण केले. या कार्यक्रमासंबंधीचे फोटो त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आणि लिहिले की, “दुर्गम गाव असो किंवा शहरी भाग, मोदी सरकार देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडत आहे.”
या दौऱ्यात अमित शाह यांनी अहमदाबादमधील प्रसिद्ध श्री भद्रकाली माता मंदिरात जाऊन दर्शन आणि पूजाअर्चा केली.मंदिर परिसर आणि आजूबाजूच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पूजेनंतर त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सरदारबाग गार्डनचे उद्घाटन देखील करण्यात आले.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी ओगणज गाव आणि चांदलोडिया येथे शहरी आरोग्य केंद्रांचे उद्घाटन केले.
या उद्घाटनाचे फोटो त्यांनी ‘एक्स’वर शेअर करत लिहिले “दूरदराजचे गाव असो किंवा शहरी भाग, मोदी सरकार देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला प्राथमिक आरोग्य केंद्रांशी जोडत आहे. आज अहमदाबादच्या ओगणज गावात आणि चांदलोडियामध्ये शहरी आरोग्य केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्रे स्थानिक नागरिकांना सुलभ व सहज वैद्यकीय सुविधा पुरवतील.”
अहमदाबाद दौऱ्यादरम्यान गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमित शाह यांनी भगवान गणेशाची आरती देखील केली. त्यांनी ‘एक्स’वर फोटो शेअर करत लिहिले, “देशभरात गणेशोत्सव आनंद आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. अहमदाबादच्या वस्त्रापुरात सरदार पटेल सेवादल आयोजित 40व्या ‘वस्त्रापुर महागणपती’ची आरती करताना मन आनंदाने भरून आले.”
त्याचबरोबर, दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिल, “गणेशोत्सवाच्या शुभ प्रसंगी, अहमदाबादच्या जोधपूरमध्ये गजानंद युवक मंडळ आयोजित ‘श्यामल का राजा’ गणेश महोत्सवात भगवान गणपतीचे पूजन केले. गणपती बाप्पा सर्वांच्या सुख-समृद्धीची मंगल कामना पूर्ण करो, ही प्रार्थना करतो.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode