इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचा प्रयोग लातूरमध्ये संपन्न
लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। माजी विद्यार्थी संघ, जयक्रांती अध्यापक महाविद्यालय यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची शौर्यगाथा सांगणाऱ्या ऐतिहासिक इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचा प्रयोग लातूर येथे करण्यात आला. प्रारंभी नटराज आण
अ


लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। माजी विद्यार्थी संघ, जयक्रांती अध्यापक महाविद्यालय यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची शौर्यगाथा सांगणाऱ्या ऐतिहासिक इथे ओशाळला मृत्यू या नाटकाचा प्रयोग लातूर येथे करण्यात आला. प्रारंभी नटराज आणि नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे पूजन करण्यात आले.

वसंत कानेटकर लिखित या ऐतिहासिक नाटकाचे साक्षीदार अनेकांना होता आले.

लातूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिलेल्या या नाट्यकलाकृतीने रसिकांची मने जिंकली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेतील प्रा ज्योतिबाजी बडे यांना पहाताना आपण साक्षात संभाजी राजे यांना अनुभवत आहोत असा आभास होत होता. ॲड हंसराज साळुंके, कु पाटील, राजीव गड्डीमे आणि सहकाऱ्यांनी भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या साकारल्या. त्यांना इंगळे कल्याण वाघमारे, अविष्कार गोजमगुंडे, दयानंद सरपाळे यांनी सहकार्य केले.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande