जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या
जळगाव, 31 ऑक्टोबर, (हिं.स.) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘अवतारम्’ या विशेष कथक नृत्य संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. एम. जे. कॉलेज परिस
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या


जळगाव, 31 ऑक्टोबर, (हिं.स.) - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि कलादर्पण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘अवतारम्’ या विशेष कथक नृत्य संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. एम. जे. कॉलेज परिसरातील कालिदास सभागृहात हा शास्त्रीय नृत्याचा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमात शहरातील प्रख्यात नृत्यांगना डॉ. महिमा मिश्रा अय्यंगार आणि त्यांच्या शिष्या कथक नृत्यातून विविध रूपांतील भगवान विष्णू यांच्या ९ अवतारांवर आधारित ‘अवतारम्’ ही संकल्पना रंगमंचावर साकारणार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा, लय आणि भावमुद्रांचा अप्रतिम संगम या सादरीकरणातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्यास प्रवेश विनामूल्य असून, जळगावातील सर्व रसिक प्रेक्षक, कलावंत आणि नृत्यप्रेमींनी या देखण्या शास्त्रीय नृत्य सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ॲड. संजय राणे आणि कलादर्पणचे उपाध्यक्ष पद्मनाभन अय्यंगार वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande