भारतावरील 50 टक्के टॅरिफचा अनोखा विरोध
भोपाळ, 13 सप्टेंबर (हिं.स.) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफचा मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे अनेखा निषेध करण्यात आला. गेल्या 1 सप्टेंबर रोजी ट्रम्प यांच्या प्रतिमेवर प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केल्यानंतर आज, शनिवारी मृत्यूभोज (तेरवी श्राद्ध) करण्यात आले. भारतीय गण वार्ता पक्षाने (भगवा पक्ष) हा मृत्यूभोज आयोजित करून आपला संताप व्यक्त केला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50 टक्के टॅरिफच्या विरोधात भोपाळमध्ये एक अनोखा आणि लक्षवेधी निषेध नोंदवण्यात आला आहे. गेल्या 1 सप्टेंबर रोजी हिंदू पारंपरिक पद्धतीने ट्रम्प यांचा प्रतीकात्मक अंतिम संस्कार करण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी बोर्ड ऑफिस चौकात भगवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गरीबांसाठी 'त्रयोदशी भोज' चे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेने 1 सप्टेंबर रोजी भारतीय उत्पादनांवर लावलेल्या 50 टक्के टॅरिफच्या निषेधार्थ, भगवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्प यांचा पुतळा जाळला होता. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, हा निषेध अमेरिकेच्या भारतविरोधी धोरणांवर आणि भारताच्या हितांना हानी पोहोचवणाऱ्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करून करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या मृत्यूभोजासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खास आमंत्रण पत्रक (कार्ड) छापून ते सर्वत्र वितरित केले होते. या वेळी त्यांनी नागरिकांना अमेरिकन उत्पादनांचा बहिष्कार करून स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचे आवाहनही केले. या मृत्युभोजात शेकडो लोकांनी सहभागी होत भोजनाचा लाभ घेतला.. या वेळी उपस्थितांना पुरी, भाजी आणि बुंदी यांचे जेवण दिले गेले.
भारतीय गण वार्ता पक्षाचे (भगवा पक्ष) राष्ट्रीय महासचिव आणि कार्यालय प्रभारी विनोद कुमार पांडे यांनी सांगितले की, भारतावर लादण्यात आलेल्या 50 टक्के टॅरिफ आणि मैत्रीच्या नावाखाली झालेल्या धोका याच्या निषेधार्थ भगवा पक्ष सातत्याने आपला विरोध नोंदवत आहे. गेल्या 1 सप्टेंबर रोजी ट्रम्प यांच्या प्रतीकात्मक शवयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पारंपरिक सनातन विधीप्रमाणे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला. त्यानंतर या श्रुंखलेतील पुढील टप्पा म्हणून त्रयोदशी आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी