मोदींच्या हस्ते बैराबी-सौरांग रेल्वे मार्गाचे लोकर्पण
मिजोरम प्रथमच भारतीय रेल्वेच्या नकाशावर लेंगपुई, 13 सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबरपासून तीन दिवसीय दौऱ्यावर असून, यामध्ये ते मिजोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांना भेट देत आहेत. दौऱ्याचा पहिला टप्पा मि
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मिझोराम दौऱ्यावरील फोटो


मिजोरम प्रथमच भारतीय रेल्वेच्या नकाशावर

लेंगपुई, 13 सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 सप्टेंबरपासून तीन दिवसीय दौऱ्यावर असून, यामध्ये ते मिजोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांना भेट देत आहेत. दौऱ्याचा पहिला टप्पा मिजोरममध्ये आज, शनिवारी पार पडला. येथे पंतप्रधान मोदींनी 8070 कोटी रुपयांच्या बैराबी-सैरांग रेल्वे लाईनसह एकूण 9000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले.

या ऐतिहासिक रेल्वे प्रकल्पामुळे मिजोरम प्रथमच भारतीय रेल्वे नेटवर्कशी थेट जोडले गेले आहे. याचबरोबर तीन नव्या रेल्वे गाड्यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात आला.आइजोलमध्ये आयोजित कार्यक्रमात, खराब हवामानामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने, पंतप्रधान मोदींनी लेंगपुई विमानतळावरूनच जनतेला संबोधित केले. त्यांनी या प्रसंगी सांगितले, बैराबी-सैरांग रेल्वे लाईन हा केवळ एक प्रकल्प नाही, तर मिजोरमसाठी विकासाची नवी क्रांती आहे. ही लाईफलाइन राज्याला भारताच्या कोटकोटीतल्या भागांशी जोडेल.

यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली आणि सांगितले की, दिवसेंदिवस उत्तर पूर्व भारत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पूर्वी केवळ मतांसाठी वापरण्यात आलेले हे राज्य आता केंद्र सरकारसाठी प्राधान्यक्रमात आहेत.

पंतप्रधानांनी यावेळी हे ही सांगितले की, गेल्या 11 वर्षांत नॉर्थ ईस्ट क्षेत्रात रेल्वे, रस्ते, इंटरनेट, मोबाईल, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. मिजोरमला उडान योजनेचा लाभ मिळालाच आहे, लवकरच येथे हेलिकॉप्टर सेवा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande