भारतीय भाषा देशाच्या एकतेचे बळ — मनोज सिन्हा
स्वभाषा व विकसित भारत विषयावर भारतीय भाषा समागम 2025 संपन्न वाराणसी,13 सप्टेंबर(हिं.स.) : हिंदुस्थान समाचार समूहाच्या वतीने पंच प्रण : स्वभाषा आणि विकसित भारत या विषयावर आयोजित भारतीय भाषा समागम 2025 कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्ह
हिंदुस्थान समाचारतर्फे स्वभाषा व विकसित भारत विषयावर भारतीय भाषा समागम 2025 मध्ये बोलतानाना मनोज


स्वभाषा व विकसित भारत विषयावर भारतीय भाषा समागम 2025 संपन्न

वाराणसी,13 सप्टेंबर(हिं.स.) : हिंदुस्थान समाचार समूहाच्या वतीने पंच प्रण : स्वभाषा आणि विकसित भारत या विषयावर आयोजित भारतीय भाषा समागम 2025 कार्यक्रमात जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना भाषेला संवादाचे नव्हे, तर संस्कृतीचे आत्मरूप असे संबोधले.

काशी (वाराणसी) येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात देशभरातील २२ भारतीय भाषांतील विद्वानांना भारतीय भाषा सन्मान देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदी, पंजाबी, तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, ओडिया, गुजराती, बंगाली, भोजपुरी, मैथिली, नेपाळी, तिबेटी, सिंधी आदी भाषांचा समावेश होता.

मनोज सिन्हा यांचे विचार

सिन्हा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्वभाषेचा अभिमान आणि तिचा व्यापक वापर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘पंच प्रण’चा एक महत्त्वाचा भाग आहे. देशाच्या आत्म्याचे वास्तव्य मातृभाषेत आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विविधतेने नटलेल्या भारतात भाषाच खरी एकतेची शक्ती आहे. काशी ही वेद-पुराणांचा उगमस्थळ असून ती भारतीय भाषांचा केंद्रबिंदू राहिलेली आहे, असे त्यांनी नमूद केले.

शिक्षणात भारतीय मूल्यांची गरज

आमदार नीलकंठ तिवारी यांनी सांगितले की, शिक्षणात भारतीय संस्कृती व मूल्यांची जोड दिली गेली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर शिक्षणसंस्था वाढल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना भारताची खरी ओळख व मूल्यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे.

शिक्षण आणि भाषेचा संबंध

शिक्षण-संस्कृती उत्थान न्यासाचे सचिव अतुल कोठारी यांनी भाषेच्या माध्यमातून संस्कृती व परंपरेचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. मातृभाषेचा पर्याय नाही. विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षणही मातृभाषेत दिले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

विश्वगुरू भारताचा मार्ग भाषेवरून

काशी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. आनंद कुमार त्यागी म्हणाले की, भारत अद्याप ‘विश्वगुरू’ का झाला नाही याचे मुख्य कारण म्हणजे मातृभाषेत शिक्षणाचा अभाव. त्यांनी नव्या शिक्षण धोरणातील तीन घटक — ज्ञान, कौशल्य विकास आणि मानवी मूल्ये यांचे संतुलन साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

काशी हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. अजीत चतुर्वेदी यांनी सांगितले की, नव्या शिक्षण धोरणामुळे देशाला ‘स्व’चे भान येईल आणि आत्मनिर्भर भारताची दिशा स्पष्ट होईल.

महत्त्वाचे मुद्दे:-

भाषा म्हणजे एकतेचे सूत्र — मनोज सिन्हा

22 भारतीय भाषांतील विद्वानांना सन्मान

मातृभाषेतून शिक्षणाची गरज अधोरेखित

नवा राष्ट्रीय शिक्षण धोरण भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याची दिशा

भारतीय भाषांच्या २२ मान्यवरांचा सन्मान

या प्रसंगी २२ भारतीय भाषांतील विद्वानांना भारतीय भाषा सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानित झालेल्या विद्वानांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश होता:

डॉ. अनिल काशीनाथ सर्जे (मराठी), डॉ. एम. संतोष कुमार (तमिळ), डॉ. कुलदीप सिंग (पंजाबी)

डॉ. मोतीलाल गुप्ता 'आदित्य' (हिंदी), डॉ. शीलवंत सिंह (सिव्हिल सेवा), डॉ. सी. शिवकुमार स्वामी (कन्नड), प्रो. देवाशीष पात्र (ओडिया), प्रो. बी. विश्वनाथ (तेलुगू), प्रो. बृजभूषण ओझा (संस्कृत)

विनायक बॅनर्जी (बंगाली), डॉ. भाग्येश वासुदेव झा (गुजराती), मनोज 'भावुक' (भोजपुरी), डॉ. प्रेमराज नूपाने (नेपाली), डॉ. बिकाश ज्योति बोरठाकुर (आसामी), डॉ. शिवानी बी (मल्याळम),डॉ. तेनजिन नीमा नेगी (तिबेटी), डॉ. रामकुमार झा (मैथिली), सुंदर दास गोहरानी (सिंधी), नवनीत कुमार सहगलच डॉ. नीलाक्षी चौधरी (कायदा व न्याय), डॉ. सौरव राय (पत्रकारिता),संतोष मधुप (पत्रकारिता) या सन्मानाने देशातील भाषिक, शैक्षणिक व सांस्कृतिक योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande