पाकिस्तान विरूद्धची भूमिका काय हे सरकारने स्पष्ट करावे - उद्धव ठाकरे
मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.) - भाजपाकडून देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. देशभक्तीची ही थट्टा आहे. व्यापारापुढे त्यांना देशाची देखील काही किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शाह यांना विचारायचंय की तुम्ही हे युद्ध संपलं आहे असं जाहीर करणार का? ह
उद्धव ठाकरे


मुंबई, 13 सप्टेंबर (हिं.स.) - भाजपाकडून देशभक्तीचा व्यापार सुरू आहे. देशभक्तीची ही थट्टा आहे. व्यापारापुढे त्यांना देशाची देखील काही किंमत राहिलेली नाही. मला राजनाथ सिंह आणि अमित शाह यांना विचारायचंय की तुम्ही हे युद्ध संपलं आहे असं जाहीर करणार का? हे गधडे सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणाले होते. आपली पाकिस्तान विरूद्धची भूमिका काय हे स्पष्ट केलं पाहिजे, ते म्हणाले होते रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. आता एखाद्या खेळावरती बहिष्कार टाकला तर असं कोणतं मोठं संकट ओढवणार आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत आपण पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवणार नाही, असं ठणकावून सांगितलं पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुखे तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

पहलगाम येथे जो हल्ला झाला त्यांचे घाव अजून भरले नाहीत, रक्त सुकले नाही. त्यातच भारत-पाकिस्तान सामना होत आहे. या पार्श्वभूमीवर आज ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, पहलगान हल्ल्यनंतर आपल्याला वाटले की, आपण पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे करू. एक चढाई केली त्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिले. भाजपाने देशभक्तीचा बाजार मांडला आहे. जय शाहांच्या हाती क्रिक्रेटच्या नाड्या आहेत. रविवारच्या सामन्यातून बक्कळ पैसा कमावण्यात येईल. मात्र देशभक्ती रक्तात भिनली पाहिजे. एकीकडे ते घर घर सिंदूर ही मोहीम राबवणार होते, मात्र आता आम्हीच त्यांना सिंदूर पाठवणार आहोत. उद्या सर्व महिला जातील आणि एक मोठ्या डब्यात घरून आणलेले सिंदूर टाकतील आणि ते डबे आम्ही मोदी यांना पाठवूे. या निमित्ताने खून और पानी एक साथ नही बहेगा, असं म्हणत त्यांनी आता खून और क्रिक्रेट एक साथ कैसे बहेगा हे पंतप्रधान मोदींनी सांगावं, असेही म्हटले आहे.

एकीकडे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांच्या तिकीट विक्रीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे क्रिकेट सामना पाहायचा की नाही हे जनतेने ठरवावं. पंतप्रधान मोदी यांच्याकडे अजूनही संधी आहे, या क्रिकेट सामन्यावर बहिष्कार करून ते चांगला संदेश देऊ शकतात. अतिशय विषण्ण मनाने मी आज बोलतो आहे. मध्ये-मध्ये पाकिस्तान हल्ला करतो, आपले सैनिक शौर्याने लढतात, शहीदही होतात. तर तिकडे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्यांनी युद्ध थांबवले. नीरज चोप्रा यांनी एक पाकिस्तानी प्रशिक्षक आणले होते, त्याला देशद्रोही ठरवले होते. आपण पाकिस्तान सोबत युद्ध पुकारले होते त्याच पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट खेळणार आहोत. तोच पाकिस्तान हा आतंकवाद पसरवत आहे. यासाठी आपण शिष्टमंडळ पाठवले होते का? मला विचारायचे आहे तुम्ही पाकिस्तान सोबत असलेले युद्ध थांबवले का? पाकिस्तानबद्दल आपली भूमिका काय आहे? असे अनेक सवा ठाकरेंनी यावेळी उपस्थित केले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडे अजूनही संधी आहे, या क्रिकेट सामन्यावर बहिष्कार करून ते चांगला संदेश देऊ शकतात. जावेद मियादाद आला होता तेव्हा बाळासाहेबांनी सांगितले होते की, तुमची नाटके बंद करा, तोपर्यंत क्रिकेट होणार नाही. आज सुषमा स्वराज हव्या होत्या, आताचे परराष्ट्रमंत्री फक्त नावात शंकर आहेत. खरं तर आता वल्लभभाई पटेल हवे होते, असेही ठाकरे म्हणाले. विक्रोळीला भाजपच्या माध्यमातून मराठी दांडिया ठेवला आहे. तिथे सिंदूर ही थीम ठेवली आहे. एक चांगली बातमी आहे, अजून या मॅचचे तिकीट हवे तसे विकले गेलेले नाही. उद्या जय शाह तिकडे मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का? भाजप तर निर्लज्ज आहेच, उद्या जाहिरात म्हणून सिंदूर मध्ये मध्ये टाका. पाकिस्तान तर सोडा पण पाकव्याप्त काश्मीर पण हे आणू शकत नाही, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande