लातूर - भाजप आ. अभिमन्यू पवारांची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांना सरसकट आणि 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत द्यावी अशी मागणी डीपीडीसी बैठकीत औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली. लातूरचे कार्यतत्पर पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रस
अ


लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकऱ्यांना सरसकट आणि 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत द्यावी अशी मागणी डीपीडीसी बैठकीत औसा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

लातूरचे कार्यतत्पर पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.

यावेळी बोलताना अभिमन्यू पवार म्हणाले की,अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर अनेक ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने शेतात पाणी घुसून सर्वदूर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी आणि नुकसानभरपाई देताना ती 2 ऐवजी 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात यावी अशी विनंती पालकमंत्री महोदयांना केली. त्यांनी 2 दोन्ही मागण्या मंत्रिमंडळ बैठकीत व मा मुख्यमंत्री महोदयांसमोर मांडून मंजूर करुन घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे व पूलांचे नुकसान झाले असून वाहतूकीला मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या क्षतीग्रस्त रस्ते/पूल दुरुस्तीची कामे अनुक्रमे ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर हानी कार्यक्रमाअंतर्गत प्रस्तावित करण्यात यावेत आणि त्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande