नांदेड, 18 सप्टेंबर, (हिं.स.)। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित “सेवा पंधरवडा” अंतर्गत देशभर विविध लोकोपयोगी व सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने कासराळी येथे गोमातेचे पूजन करून एक पेड माँ के नाम ह्या अंतर्गत नांदेडचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे मॅडम, गंगाई गुरूमाय बाभळी, चंद्रशेखर पाटील सावळीकर, आबाराव संगनोड, हावगीराव गोपछडे, धोंडू सावकार कोत्तावार, भाजपा मंडळ अध्यक्ष शिवराज बोधने, अरविंद ठक्करवाड, शंकर रेड्डी वकरलावार, अभिजीत धरमुरे, संदीप रामपुरे, राजेश खरबाळे, शंकर गंगुलवार, दत्तराम पिल्लेवाड, यांसह प्रमुख पदाधिकारी, बूथप्रमुख, तसेच शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis