छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। कांग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील
सिल्लोड तालुक्यातील धावडा, चारनेर, पेंडगाव व घाटनांद्रा या गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांची पाहणी केली.
या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना शक्य ती मदत मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis