छ.संभाजीनगर : खा. भुमरे यांनी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी आज कन्नड तालुक्यातील डोनगाव, बहिरगाव, चिकलठाण व दाभाडी या गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केली. शेतकरी बांधवांच्या
अ


छत्रपती संभाजीनगर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांनी आज कन्नड तालुक्यातील डोनगाव, बहिरगाव, चिकलठाण व दाभाडी या गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी केली.

शेतकरी बांधवांच्या चिंता आणि व्यथा प्रत्यक्ष ऐकून त्यांच्या परिस्थितीची गंभीरता समजून घेतली. उभ्या पिकांचे नुकसान, घरांचे झालेलं मोठं नुकसान आणि दैनंदिन जगण्यावर आलेले संकट हे अत्यंत वेदनादायी आहे.या कठीण प्रसंगी शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून योग्य न्याय मिळावा, हीच आमची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर शेतकरी व नागरिकांना आवश्यक ती मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande