सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा माजी पदाधिकारी म्हणून ओळख असलेल्या अनमोल केवटे याचा लातूरमध्ये खून झाल्याची घटना घडली असून मयत केवटेवर मंद्रूपमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. अनमोल केवटे याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीसाठी अनमोल केवटे हा लातूरला गेला होता, परत येताना मध्यरात्री एकच्या सुमारास ईर्टीका गाडीमधून येत असताना त्यांच्या आडवी क्रुझर लावून आतील अनमोल केवटे याचा गळ्यावर वार करून खून करण्यात आला. त्याच्यासोबत असलेली महिला सुद्धा या हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित महिला ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड