सोलापूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)।
पहलगाम हल्ल्यामध्ये निरपराध लोकांना धर्म विचारून ठार मारण्यात आले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तराचा निर्णय हा पूर्णपणे लष्कराने स्वतंत्र घेतला होता. पाकिस्तानी दहशतवादी स्थळांवर हल्ले केल्यानंतर भारत यशाने बेभान झाला नाही. पाकिस्तानी लष्करातून भारताला शरणागतीचा मेसेज आला म्हणून ऑपरेशन सिंदूर थांबवले, अशी माहिती भाजपा खासदार डॉ. उज्ज्वल निकम यांनी दिली. विवेकानंद केंद्र सोलापूर शाखा यांच्या वतीने विश्वबंधुत्व दिनानिमित्त रंगभवन येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय विवेकानंद केंद्राचे कोषाध्यक्ष प्रवीण दाभोलकर, मनीष बलदवा, दीपक पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ‘किशोर विकास’, ‘हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व’, ‘मार्क्स आणि विवेकानंद’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन खासदार उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड