राजा चार्ल्स तिसरे यांनी मोदींना दिले होते भेटनवी दिल्ली , 19 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी कदंबाचे एक रोप लावले. हे रोप युनायटेड किंगडमच्या राजा चार्ल्स तृतीय यांच्या विशेष भेटवस्तूप्रमाणे पाठवण्यात आले होते. राजा चार्ल्स तृतीय यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना ही भेट दिली होती.हा कदंबाचा वृक्ष भारत आणि यूकेमधील मैत्री आणि पर्यावरणीय शाश्वततेप्रती असलेल्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक मानले जात आहे.
दिल्लीतील ब्रिटिश हाय कमीशनने यासंदर्भात लिहिले की,“महामहिम महाराजांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कदंबाचे रोप भेट देत अत्यंत आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींच्या ‘एक झाड आईच्या नावाने’ या उपक्रमातून प्रेरणा घेऊन घेतलेली ही पावती पर्यावरण संवर्धनाविषयी असलेल्या त्यांच्यातील सामायिक बांधिलकी दर्शवते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजा चार्ल्स यांना पूर्वी एक रोप भेट दिले आहे. जुलै महिन्यात पंतप्रधान मोदी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी नॉरफॉक येथील सॅंड्रिंघम एस्टेटमध्ये राजा चार्ल्स यांची भेट घेतली होती आणि त्यांना एक विशेष झाड भेट दिले होते.हे झाड ‘एक झाड आईच्या नावाने’ या अभियानाअंतर्गत ‘डेव्हिडिया इनवोलुक्रेटा – सोनोमा’ या प्रजातीचे होते. हे झाड सामान्यतः ‘सोनोमा डव ट्री’ म्हणून ओळखले जाते. हे एक सजावटी झाड आहे, ज्यामध्ये कमी वेळात भरपूर फुलं येतात.सामान्यतः डेव्हिडिया इनवोलुक्रेटा प्रजातीच्या झाडांना फुलं यायला 10 ते 20 वर्षांचा कालावधी लागतो, पण ‘सोनोमा’ ही एक अशी किस्म आहे जी 2 ते 3 वर्षांतच फुलायला लागते. त्यामुळेच ती अल्पकालीन फुलणारी आणि सजावटी उद्देशासाठी विशेष मानली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode