भंडारा, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील खांबाडी येथील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते दोघे शेताजवळील नाल्यावर मासे पकडण्याकरिता गेले होते. नाल्यावर असलेल्या सिमेंटच्या बंधार्यावरील शेवाळलेल्या जागेवरून पाय घसरून दोघेही नाल्यात पडले व पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. काल सायंकाळच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली असून घनश्याम रामटेके व मिलिंद सुखदेवे असे मृतकाची नावे आहेत.या प्रकरणी पवनी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar