लिस्बन, ३० सप्टेंबर (हिं.स.). बंगळुरूची रायडर ऐश्वर्या पिस्सेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बीपी अल्टिमेट रॅली-रेड पोर्तुगाल २०२५ (FIM वर्ल्ड रॅली-रेड चॅम्पियनशिप - W2RC) च्या चौथ्या फेरीत आपल्या श्रेणीत विजय मिळवणारी ती आशिया आणि भारतातील पहिली महिला ठरली आहे. रॅली२ - महिला श्रेणीत स्पर्धा करताना ऐश्वर्या केवळ तिच्या श्रेणीतच जिंकली नाही. तर एकूण २७ व्या स्थानावर राहिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या रायडर्सविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी तिने केली आहे.
जगातील सर्वात कठीण रॅली-रेड मालिकेत प्रायव्हेटियर म्हणून विजय मिळवणे ही भारतीय आणि आशियाई मोटरस्पोर्ट्ससाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे. टीव्हीएस रेसिंग आणि त्यांच्या सहाय्यक भागीदारांच्या भक्कम पाठिंब्याने ऐश्वर्याने जागतिक स्तरावर स्वतःला सिद्ध केले आहे.
आपल्या या ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली, ही विजय माझ्यासाठी खास आहे. या पातळीवर जिंकणारी आशिया आणि भारतातील पहिली महिला म्हणून, हा माझ्यासाठी केवळ एक वैयक्तिक मैलाचा दगड नाही, तर आपले स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी एक संदेश आहे. मी टीव्हीएस रेसिंग आणि माझ्या सर्व भागीदारांची आभारी आहे ज्यांनी हा हे शक्य केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे