केंद्र सरकार, भाजपावर टीका, डाॅ. संग्राम पाटलांची मुंबई पोलिसांकडून चौकशी, नोटीस देऊन सोडले
मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.) - केंद्र सरकार आणि भाजपाच्या नेत्यांवर सातत्याने टीका केल्याच्या आरोपावरून लंडन स्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावरून आज, शनिवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास त्यांना ताब्
डॉ. संग्राम पाटील


मुंबई, 10 जानेवारी (हिं.स.) - केंद्र सरकार आणि भाजपाच्या नेत्यांवर सातत्याने टीका केल्याच्या आरोपावरून लंडन स्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुंबई विमानतळावरून आज, शनिवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले. मुंबईतील ना.म. जोशी पोलीस ठाण्यात त्यांची दिवसभर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी नोटीस देऊन त्यांना सोडलेे. भाजपा कार्यकर्ते निखिल भामरे यांनी केलेल्या तक्रारीवरून डॉ. पाटील यांना ताब्यात घेतले आहे.

संग्राम पाटील हे वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. सध्या ते ब्रिटनमध्ये वैद्यकीय सेवा करत आहेत. कोरोना काळात भारतात भीतीदायक वातावरण होते. तेव्हा ते समाज माध्यमांवरून ते लोकांना उपाय सांगत होते. तसेच भारत सरकारच्या अनेक योजना आणि निर्णयांवरही ते आपली मते मांडत असतात. यातूनच त्यांची प्रतिमा भारत सरकार विरोधी असल्याचा आरोप केला जातो. डॉ. संग्राम पाटील यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा मलिन करणे तसेच भाजपा विचारधारेचे समर्थन आणि त्याचा विरोध करणाऱ्या समाजातील गटांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने चुकीची आणि खोटी माहिती पसरवली, असा आरोप भाजप कार्यकर्ते निखिल भामरे यांनी केला आहे.

निखिल भामरे, (25, रा. ठाणे) हे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून काम पाहतात. तसेच ते विविध इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाद्वारे आमच्या पक्षाची कार्यपद्धती आणि पक्षाचे कामकाजाबाबत नियमितपणे पाहणी करीत असतात. दरम्यान 18 डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे पक्ष कार्यालयात येत असताना सोशल मीडियावर सक्रिय होतो. त्यावेळी डिझाईल रोड लोअर परेल मोनो रेल स्टेशन जवळून जात असताना 10.19 वाजताचे दरम्यान माझ्या निदर्शनास आले की, शहर विकास आघाडी या फेसबुक खातेदाराकडून त्याचे फेसबुक खात्यावर 14 डिसेंबर रोजी 01.58 वा टाकलेल्या लिंकमध्ये आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे निदर्शनास आले. सदर प्रसारित केलेला मजकूर हा आमच्या पक्षाच्या भारतातील प्रमुख नेत्यांबद्दल तसेच आमच्या पक्षाबद्दल द्वेष पसरवण्यासाठी प्रसारित केल्याचे दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande