मोबाइलवर अ‍ॅप डाऊनलोड करणे शिक्षकाच्या अंगलट
बीड, 11 जानेवारी (हिं.स.)। बँकेच्या नावे असलेले बनावट अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे शिक्षकाच्या अंगलट आले. सायबर ठगांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षकाच्या खात्यातून तब्बल ६ लाख ६३ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठ
मोबाइलवर अ‍ॅप डाऊनलोड करणे शिक्षकाच्या अंगलट


बीड, 11 जानेवारी (हिं.स.)। बँकेच्या नावे असलेले बनावट अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे शिक्षकाच्या अंगलट आले. सायबर ठगांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षकाच्या खात्यातून तब्बल ६ लाख ६३ हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तात्याराम जरांगे (रा. मातोरी ता. शिरुर) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक अॅपची एपीके फाईल आली होती.

एसबीआय बँकेच्या नावे हे अ‍ॅप होते. बँकेचे अ‍ॅप खरे असल्याचा समज झाल्याने जरांगे यांनी ते आपल्या मोबाईलमध्ये डोऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर काही ओटीपी आले. एकूण सात ट्रान्झेंक्शन होऊन त्यांच्या बँक खात्यातून ६ लाख ६३ हजार ७३५ रुपये डेबीट झाले. त्यानंतर सायबर ठगांकडून फसवणूक झाल्याची बाब जरांगे यांच्या लक्षात आली. त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande