
परभणी, 14 जानेवारी (हिं.स.)। पाथरी तालुक्यातील बांदरवाडा शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात आखाड्यावर बांधण्यात आलेले म्हशीचे रेडकू (वासरु) बिबट्याने पळवून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन बापूराव गायकवाड (रा. बांदरवाडा) शिवारात गट नंबर ११४ मध्ये शेती आहे. संबंधित पथकाला परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले.
शेतकऱ्याचा शेतात आखाडा आहे. आपल्या शेतातील आखाड्यावर काही म्हशी आणि म्हशीचे रेडकू त्यांनी बांधले होते. बिबट्याने अचानक हल्ला करत रेडकू
आखाड्यावरून पळवून नेले. हा प्रकार संबंधित शेतकरी पहाटे शेतात दुचाकीवरून गेल्यानंतर लक्षात आला. बिबट्याने म्हशीचे रेडकू बाजूचे शेतकरी जिजाभाऊ साळवे यांच्या उसाच्या फडात नेऊन फस्त केले.
घटनेची माहिती मिळताच, वनविभागाचे वनपाल बुचाले, वनरक्षक अंकुश जाधव, वमनजूर जनार्धन राठोड, पांडू वाघ यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपासाच्या दरम्यान परिसरात बिबट्याचे ठसे (पाऊलखुणा) आढळून आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis