परळी नगरपालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गटात नाट्यमय घडामोडी
बीड, 14 जानेवारी (हिं.स.)। परळी नगरपरिषदेत नाट्यमय घडामोडी घडत आहेत.उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीची तारीख जवळ आलेली असताना, परळी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या गटात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एमआयएमच्या आघाडीतील समावेशावरून उ
परळी नगरपालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गटात नाट्यमय घडामोडी


बीड, 14 जानेवारी (हिं.स.)। परळी नगरपरिषदेत नाट्यमय घडामोडी घडत आहेत.उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीची तारीख जवळ आलेली असताना, परळी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या गटात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. एमआयएमच्या आघाडीतील समावेशावरून उठलेले वादळ शमलेले नसताना, अपक्ष नगरसेविका अर्चना रोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना गटातून बाहेर पडण्याचे दिलेले पत्र २४ तासांच्या आत - मागे घेतले. त्यांनी आपण आघाडीत कायम असल्याचे पत्राद्वारे कळवल्याने नगरसेवकांच्या या नाट्यमय घडामोडींची शहरातील राजकारणात चर्चा होत आहे.

परळी नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि अपक्षांचा स्थापन झालेल्या गटात एमआयएमच्या नगरसेविका शेख आयेशा मोहसीन यांच्या समावेशावरून वादळ उठलेले असताना प्रभाग क्रमांक ८ ब मधून निवडून आलेल्या अपक्ष नगरसेविका अर्चना महेंद्र रोडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मी अधिकृतरीत्या आघाडीतून बाहेर पडत असल्याची लेखी माहिती सादर करीत असल्याचे पत्र दिले होते. यानंतर स्वाक्षऱ्यांचे खलबते झाल्यानंतर अर्चना रोडे यांचा गैरसमज दूर झाला आणि गटनेते वैजनाथ सोळंके आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपण गटातच राहणार असल्याचे कळवले आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande