अकोला - जुने शहर भागात शिंदे सेना आणि भाजप उमेदवार यांच्यात वाद
अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील 29 महापालिका सह अकोल्यात आज मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मात्र अकोल्यातील जुने शहर भागातील प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप उमेदवार आणि शिंदे गटाचे उमेद
Photo


अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)। राज्यातील 29 महापालिका सह अकोल्यात आज मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मात्र अकोल्यातील जुने शहर भागातील प्रभाग क्रमांक 17 मधील भाजप उमेदवार आणि शिंदे गटाचे उमेदवार यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्याचं पाहायला मिळाले. मात्र पोलिसांच्या मध्यस्थी नंतर हा वाद निवळला आहे.

अकोल्यात महापालिका निवडणूक शांततेत पार पडली. 80 जागेसाठी घेण्यात आलेल्या या निवडणुकीत 469 उमेदवार यांचं भाग्य मतदान यंत्रात बंद झालं.. दरम्यान अकोल्यात काही किरकोळ वाद वगळता कुठलाही मोठा अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आहे.. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जूने शहर भागातील श्री शिवाजी विद्यालय येथे प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार भाजप उमेदवार करण शाहू आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार राजेश मिश्रा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली त्याचबरोबर अंगावर धावून गेल्याचाही प्रकार पाहायला मिळाला. वाद विकोपाला जात असताना दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी मतदान केंद्राजवळ मोठी गर्दी केली याकरिता पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.मात्र परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सुरळीत मतदान सुरू आहे. यावेळी महिलांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप भाजपच्या उमेदवारांनी लगावला आहे या प्रकरणामुळे आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande