अकोला - मतदानानंतर बोटावर शाई न लावल्याची तक्रार; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न
अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)। अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये झालेल्या मतदानानंतर एका महिला मतदाराने मतदान नोंदीनंतर बोटावर शाई न लावल्याबद्दल तक्रार केली आहे.निवडणूक आयोगाने मतदान केलेल्या व्यक्तीच्या बोटावर शाई लावणे अनिवार्य केलेले असून, ही
Photo


अकोला, 15 जानेवारी (हिं.स.)। अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये झालेल्या मतदानानंतर एका महिला मतदाराने मतदान नोंदीनंतर बोटावर शाई न लावल्याबद्दल तक्रार केली आहे.निवडणूक आयोगाने मतदान केलेल्या व्यक्तीच्या बोटावर शाई लावणे अनिवार्य केलेले असून, ही प्रक्रिया मतदानाच्या कायदेशीर आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाची समजली जाते.तरीही, अनेक ठिकाणी मतदान नंतर बोटावर शाईचा ठेवा केला गेला नाही, अशी तक्रार मतदारांनी केल्याचे समोर आले आहे.या संदर्भात अकोल्यातील सोशल मीडियावर एक व्हायरल व्हिडीओही प्रसारित होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील एका महिलेने सांगितले की, तिने मतदान केले असतानाच मतदान कर्मचाऱ्यांनी तिच्या बोटावर शाई लावली नाही.मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपली नाराजी व्यक्त करत याबाबत स्पष्टीकरण व योग्य कारवाईची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande